Pimpri Assembly Constituency | ‘मला इतर पक्षातून संपर्क साधला जातोय, पण…’ आमदार अण्णा बनसोडेंचं ठरलं!

anna-bansode

पिंपरी : Pimpri Assembly Constituency | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) विधानसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुटल चर्चा रंगल्या आहेत. अखेर यावर अण्णा बनसोडे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतात. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Pimpri Assembly Constituency)

लोकसभा निवडणुकीनंतर अण्णा बनसोडे हे महायुती (Mahayuti) मधून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने अमित गोरखे (Amit Gorkhe) यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने पिंपरी विधानसभेतील बनसोडे यांच्या मार्गातील काटा दूर केल्याची चर्चा आहे. याच दरम्यान मला इतर पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे फोनही येतायेत. परंतु, विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मी ठरवेन आणि माझं ठरलंय. मी अजितदादांचा कट्टर समर्थक असल्यानं मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे, असं म्हणत बनसोडेंनी चर्चांना पूर्णविराम दिला.

जागा राष्ट्रवादीलाच सुटणार

भाजपने अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन बनसोडे यांच्या वाटेतील काटा दूर केला. याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजप, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना, आरपीआयची युती आपण पाहतोय. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक असतात. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अमित गोरखे इच्छूक होते. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मागील दहा वर्षापासून मी या मतदारसंघात आमदार म्हणून काम करत आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच सुटेल असा मला विश्वास आहे, असे बनसोडे यांनी सांगितले.

मी अजितदादांकडूनच लढणार

मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. माझं ठरलं आहे की, कुठल्या पक्षातर्फे लढायचे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात काम करताना प्रत्येकाचे फोन मला येतात. मात्र, जो निर्णय घेयचा आहे तो मी घेईल. पण मला वाटते की, मी अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढेल.

विलास लांडेशी रोज संपर्क

माजी आमदार विलास लांडे यांचे समर्थक शरद पवार गटाला जाऊन भेटून आले आहेत.
त्यांच्याकडून तुम्हाला संपर्क झाला आहे का? यावर बोलताना बनसोडे म्हणाले,
विलास लांडे माझे चांगले सहकारी आहेत. आमचा रोज संपर्क होतो. मात्र,
त्यांच्यासोबत अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

You may have missed