Pimpri Assembly Constituency | पिंपरी मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागेवर शिंदे गटाचा दावा; खासदार बारणे म्हणाले…

पिंपरी: Pimpri Assembly Constituency | पिंपरीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट (Shivsena Shinde Group) करणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी हा दावा केला आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. बनसोडेंबद्दल प्रचंड नाराजी असल्यानं ते पराभूत होतील आणि महायुतीचा एक आमदार कमी होईल. ही निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल”, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यावर आता अण्णा बनसोडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “महायुतीच्या बैठकीत शिंदे गटाने पिंपरी विधानसभेची मागणी केली तरी अजित पवार ही जागा माझ्यासाठी घेणारचं. ज्या पक्षाचे ज्या-ज्या ठिकाणी आमदार असणार आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाला ती उमेदवारी किंवा ती जागा सोडण्यात येणार आहे. पिंपरीसाठी अजित दादा आग्रही असतील असा माझा अंदाज आहे”, असे बनसोडे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा