Pimpri-Chinchwad-Bhosari Assembly Election 2024 | पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघात बंडखोरी; दोन्हीकडील पक्ष बंडखोरी कशी रोखणार? राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे: Pimpri-Chinchwad-Bhosari Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) अर्ज दाखल करण्याची काल (दि.२९) शेवटची मुदत होती. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघांत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बंडखोरी झाली आहे.
त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आता अर्ज माघारी साठी ४ नोव्हेंबरची मुदत असून दोन्हीकडील पक्ष बंडखोरी कशी रोखणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सोमवार, दि. ४ नोव्हेंबरला अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जामधून लढतीचे चित्र समोर आले आहे. भोसरीमध्ये तिरंगी, पिंपरीत बहुरंगी, चिंचवडला चौरंगी आणि मावळमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरीमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) विद्यमान आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) उमेदवार असून, भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, आरपीआय आठवले गटाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांचीही अपक्ष उमेदवारी आहे. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
भोसरीमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे रिंगणात आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांनीही अर्ज दाखल केला आहे. येथे सध्या तिरंगी लढत दिसत आहे.
चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला असून, महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी असल्याने याठिकाणी चौरंगी लढत दिसत आहे.
तर मावळमधून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात प्रमुख लढत आहे. येथे महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार न देता भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. भेगडे यांना भाजपच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला असून, येथे दुरंगी सामना होणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा