Pimpri Chinchwad Crime Branch News | सराईत चोरट्याकडून सोनसाखळी चोरीचे ५ गुन्हे उघडकीस; ४ लाख ३० हजारांचा ऐवज हस्तगत, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी (Video)

Pimpri Chinchwad Crime Branch

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | पिंपरी येथील सोनसाखळी चोरीचे सीसीटीव्ही फुटेजवरुन सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील चौकशीत सोनसाखळी चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/C_s2S0hJnoH/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

अनिरुद्ध योगेश नानावत (वय २२, रा. कुसेगाव, ता. दौंड) असे या सराईत चोरट्याने नाव आहे. त्याविरुद्ध यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल असून पालघर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चैन चोरीच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. घटनास्थळाच्या ठिकाणचे अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. त्यात रेकॉर्डवरील आरोपी अनिरथ नानावत याचा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. चौकशीत त्याने दोन साथीदाराच्या मदतीने पिंपरी, चिंचवड, चिखली व निगडी परिसरात चैन चोरी केल्याचे आढळून आले. चिखली पोलीस ठाण्यातील २ आणि पिंपरी, निगडी, चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्याच्याकडून चोरीला गेलेला एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर,
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खाडे, औदुंबर रोगे, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, प्रविण कांबळे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमीत देवकर, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, हर्षल कदम व अमर कदम यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed