Pimpri Chinchwad Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Pimpri Chinchwad Crime Branch

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | २ बुलेट, पल्सर, यामाहा, स्प्लेंडर, हिरो डिलक्स अशा ५ लाख रुपयांच्या ६ मोटारसायकल चोरणार्‍या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी या चोर्‍या मोशी, भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी आणि सोलापूर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. (Vehicle Theft Detection)

https://www.instagram.com/p/DAISOUvp2vC

प्रसाद भारत पांडव (वय २३, रा. मोशी) आणि त्याचा साथीदार सचिन अशोक सुदाम (वय २४, रा. विश्वकर्मा कॉलनी, वेरुळ, ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रसाद पांडव हा संभाजीनगर येथील सराईत वाहन चोर आहे. (Arrest In Vehicle Theft)

https://www.instagram.com/p/DAGgS5oJ9rK

गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन मोरे व प्रमोद गर्जे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, १६ सप्टेबर रोजी दोघे जण चोरीची दुचाकी विक्रीकरता मोशी येथील अग्निशामक केंद्र परिसरात येणार आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी युनिट १ने दोन पथके तयार करुन अग्निशामक केंद्र परिसरात सापळा लावला. बातमीदाराने सांगितल्या प्रमाणे दोघे जण मोटारसायकल वरुन संशयितरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडील पल्सर ही डिसेबर २०२२ मध्ये मोशी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. दोघांना अटक करुन अधिक तपास केला असता त्यांनी ६ मोटारसायकली चोरीचे गुन्ह्यांची कबुली दिली.

https://www.instagram.com/p/DAGYk9BpBim

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर (Shashikant Mahavarkar), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे (DCP Sandeep Doifode), सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे (ACP Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे (PSI Shivaji Kanade), पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, प्रमोद गर्जे, स्वप्निल महाले यांनी केली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch News)

https://www.instagram.com/p/DAFjxRCJoyk

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Aarpaar Marathi | ‘आरपार’तर्फे प्रसारित केलेल्या पुनीत बालन प्रस्तुत ‘बाप्पा मोरया रे’ विसर्जन मिरवणुकीच्या ‘थेट प्रक्षेपणाला’ भरघोस प्रतिसाद!

IPS Shivdeep Lande Resigns | बिहारचे सिंघम मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचा तडकाफडकी राजीनामा; कारण अस्पष्ट

BJP Strategy For MH Election 2024 | भाजपच्या 50 उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला; विधानसभेच्या 160 जागा लढण्याच्या तयारीत