Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

pistol

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | गहुंजे गावाकडून क्रिकेट स्टेडियमकडे (Gahunje Stadium Pune) जाणार्‍या रोडजवळ मध्यरात्री थांबलेल्या तरुणाला अटक करुन पोलिसांनी गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Pistol Seized )

लखन ऊर्फ निखिल बाळु आगळे (वय २५, रा. देहुरोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस हवालदार गणेश मालुसरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक किशोर पाटील (PI Kishor Patil) यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी (PSI Rahul Koli) , हवालदार गणेश मालुसरे, पवार, शेख, भोसले हे खासगी गाडीने कोबिंग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिग करत होते. यावेळी पोलीस नाईक शेख, हवालदार गणेश मालुसरे यांना बातमी मिळाली की, गहुंजे क्रिकेट स्टेडियमकडे जाणार्‍या रोडलगत एक जण संशयितरित्या थांबला आहे.

त्याच्याकडे पिस्टल आहे. तो काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत थांबला आहे़. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी गेले.
पोलिसांना पाहून गडबडीत लखन तेथून निघून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली.
त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्टल व त्यात २ जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी त्याला अटक करुन पिस्टल व काडतुसे जप्त केली आहेत.
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खामगळ (PSI Ravindra Khamgal) तपास करीत आहेत. (Pimpri Chinchwad Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed