Pimpri Chinchwad Crime Branch News | धुळ्यातून गांजाची तस्करी करुन पुण्यात विक्रीसाठी आलेल्यास अटक; 55 किलो गांजासह 32 लाखांचा माल जप्त (Video)

पुणे : Pimpri Chinchwad Crime Branch News | धुळे येथील शिरपूर येथून गांजाची तस्करी करुन कारने पुणे शहरात विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५५ किलो गांजासह ३२ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. धुळे, मध्य प्रदेशातून येणार्या गांजा तस्करांचा पकडण्याची पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी एस टी बस व रिक्षातून गांजाची तस्करी करणार्यांना पकडण्यात आले होते. (Arrest In Ganja Case)
https://www.instagram.com/reel/DCvtSbBJaLO/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, ता़ जि़ नाशिक) असे या तस्कराचे नाव आहे. पिंपरी चिंचवड शहर अंंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यादृष्टीने पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांनी सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षकांची सहा वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कारवाईचे आदेश दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांचे पथक दिघी आळंदी परिसरात रात्री संशयित वाहनांची तपासणी करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश कर्पे यांना आळंदी घाट येथून एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार दिघीचे दिशेने भरधाव जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबवून चौकशी केली. तेव्हा त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्या वागण्याचा संशय आल्याने त्याच्याकडील कारची तपासणी केली. त्यात गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यात एका पोत्यामध्ये ५५ किलो ६९० ग्रॅम गांजा आढळून आला. पिंजारी याच्या ताब्यातून ३२ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा गांजा, मारुती कार, २ मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड,
पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने,
निखिल वर्पे, कपिलेश इगवे, चिंतामण सुपे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे
यांच्या पथकाने केली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट