Pimpri Chinchwad Crime Branch News | बीडमधील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या 3515 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पिता-पुत्राला अटक

Pimpri Chinchwad Crime Branch

खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | बीडमधील कुटे ग्रुपच्या (Beed Kute Group) ज्ञानराधा मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटीच्या (Dnyanraddha Multistate) ५२ शाखांमधील ४ लाख ५० हजार ठेवीदारांची ३५१५ कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करुन ४२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेले व्हाईस चेअरमन व डायरेक्टर पिता पुत्रांना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने अटक केली आहे. (Anti Extortion Cell Pimpri)

यशवंत वसंतराव कुलकर्णी Yashwant Vasantrao Kulkarni (वय ५५) आणि वैभव यशवंत कुलकर्णी Vaibhav Yashwant Kulkarni (वय २४, दोघे रा. लेगसी मिल्लेन्निया सोसायटी, गायकवाडनगर, पुनवाळे, मुळ शिंदेनगर, बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी ४२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी यशंवत कुलकर्णी याला पकडून देणार्‍यास रोख बक्षीसही जाहीर करण्यात आलेले होते.

https://www.instagram.com/p/C_VUfLtp0Py

खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील अधिकारी व अंमलदार हे गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेले व फरार आरोपींची माहिती घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार गणेश गिरी गोसावी यांना बातमीदाराकडून ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे बीड घोटाळ्यामधील आरोपी पिता पुत्र हे वाकड येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall Wakad) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघा पिता पुत्रांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी करुन पुढील कार्यवाहीसाठी त्यांना बीड शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Beed Police)

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, सुनिल कानगुडे, किरण काटकर, किशोर कांबळे, भुपेंद्र चौधरी, प्रदीप गायकवाड यांनी केली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद