Pimpri Chinchwad Cyber Cell Police | नार्कोटिक्स मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक
चिंचवड : Pimpri Chinchwad Cyber Cell Police | मुंबई येथून इराण येथे तुमच्या नावाने पार्सल जात असून त्या पार्सलमध्ये ड्रग्स आहेत. असे सांगून महिलेची २४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार संशयितांना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक केली.
स्वरूप अशोक खांबेकर Swaroop Ashok Khambekar (वय-४२, कोपरगाव जि-अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले
Pushkar Chandrakant Pakhle (रा-चाळीसगाव, जि- जळगाव), मोनिक भरतभाई रंगोलीया (Monica Bharatbhai Rangoliya), कौसिक मन्सूखभाई बोराडे Kaushik Mansukhbhai Borade (दोघे रा. सुरत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाणेर (Baner) येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली होती.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doifode) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून बोलत असल्याचे भासवले. तुमचे मुंबई ते इराण असे कुरिअर जात आहे. त्या औषधाच्या एका कुरिअरमध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो, असे म्हणत संशयिताने कॉल दुसऱ्या संशयिताला जोडला.
त्यानंतर दुसऱ्या संशयिताने ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवल्याचे सांगितले. तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप अॅपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले. (Pimpri Chinchwad Cyber Cell Police)
स्काइप अॅपच्या माध्यमातून संशयितांनी फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा ऍक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत हिंजवडी पोलिस तपास करीत होते. याच गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून सुरू होता.
सायबर पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्याची माहिती मिळवली.
त्याद्वारे संशयितांची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले.
संशयितांनी वापरलेल्या बँकेच्या खात्यावर दोन कोटींहून अधिक रक्कमेचे व्यवहार झालेले आहेत.
त्या खात्याबाबत भारतातून ६८ तक्रारी आल्या आहेत.
सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे (ACP Vishal Hire)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देवडे (Anil Devde PI),
सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी (API Pravin Swami), उपनिरीक्षक सागर पोमण (PSI Sagar Poman),
पोलीस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबूले,
स्वप्नील खणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून