Pimpri Chinchwad Flood | पुरात अडकलेल्या महिलेचा रेस्क्यू टीमकडे हट्ट, 14 श्वानांना बाहेर काढले तरच मी बाहेर येईन (Video)
पुणे : Pimpri Chinchwad Flood | पिंपरी-चिंडवडमध्ये पुराच्या पाण्यात घरात अडकलेल्या एका महिलेने रेस्क्यू टीमला फोन केला. रेस्क्यू टीम जेव्हा पोहोचली तेव्हा, महिलेने तिच्यासोबत असलेल्या प्राण्यांना बाहेर काढल्याशिवाय मी बाहेर येणार नाही असे म्हटले. अखेर रेस्क्यू टीमने मोठ्या धाडसाने सर्व प्राण्यांना सुखरूप बाहेर काढले नंतर ती महिला देखील बाहेर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (RESQ Charitable Trust Team)
पिंपरीच्या मार्केट भागात पुराचे पाणी शिरल्याने एक महिला घरात अडकली होती. पाणी वाढल्याने महिलेने १४ कुत्रे आणि १ मांजर यांना एका खोलीत ठेवले. दरम्यान महिलेला वाचवण्यासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची टीम आली असता, महिलेने सर्व प्राण्यांना वाचवल्यानंतरच मी बाहेर येईन, असे म्हटले.
प्राण्यांना वाचवण्यासाठी महिला अडून बसल्याने रेस्क्यू टीमने अखेर प्राण्यांना वाचविण्याचा निर्णय घेतला. रेस्क्यू टीमने एक-एक करून १४ कुत्रे आणि १ मांजर यांना पुराच्या पाण्यातून बाहेर आणले.
पुराचे पाणी रेस्क्यू टीमच्या छातीपर्यंत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. सर्व प्राणी सुखरुप बाहेर आणल्यानंतर ती महिला बाहेर आली. दरम्यान, रेस्क्यू टीमने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन
Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”