Pimpri Chinchwad Police Inspector | पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षाला सलंग्न; एकच खळबळ
पिंपरी : Pimpri Chinchwad Police Inspector | अवैध धंदे आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याला जबाबदार धरुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाला (Pimpri Chinchwad Police Control Room) सलंग्न करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे ( DCP Madhuri Kangne) यांनी हा आदेश काढला आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याचे (Chinchwad Police Station) वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी (PI Jitendra Koli), दिघी पोलीस ठाण्याचे (Dighi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (PI Vijay Dhamal) आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (Talegaon MIDC Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर (PI Ankush Banger) यांना सलंग्न करण्यात आले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap Case) दिघी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ढमाळ यांचा दप्तरी (रायटर) अमोल जाधव (Police Amol Jadhav) याला अटक केली होती. तसेच चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाया करण्यात आल्या. त्यांना जबाबदार धरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे समजते..
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान