Pimpri Chinchwad Police MCOCA Action | कुख्यात गुन्हेगार रोहित धनवे टोळीवर मोक्का कारवाई ! 26 गुन्हेगारी टोळ्यांमधील 152 गुन्हेगारांवर वर्षभरात कारवाई

IPS Vinoy Kumar Choubey

पिंपरी : Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी, नेहरुनगर, खंडेवस्ती परिसरात दहशत निर्माण करुन जबरी चोरी, खंडणी वसुली असे गुन्हे करणार्‍या कुख्यात गुन्हेगार रोहित धनवे टोळीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

रोहित प्रविण धनवे Rohit Pravin Dhanve (वय २१, रा. नेहरुनगर, पिंपरी), सागर अशोक पंडित (वय २५, रा. खंडेवस्ती, एमआयडीसी भोसरी) आणि दिलीप ऊर्फ पाजी ऊर्फ सरदार इंद्रजित चौहान (रा. नेहरुनगर, पिंपरी) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

रोहित धनवे व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवरुन येऊन खंडेवस्ती येथील स्कॅप सेंटर दुकानाचे दुकानदार विनोद विश्वकर्मा यांना शिवीगाळ करुन दुकानातील पैशांबाबत विचारणा केली. त्यांच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले होते. त्यांच्या खिशातील २२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते. या प्रकरणात भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. रोहित धनवे याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. या टोळीची खंडेवस्ती, नेहरुनगर, पिंपरी परिसरात दहशत आहे. त्यामुळे कोणीही पुढे येऊन तक्रार देत नव्हते.

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर,
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे,
यांनी केला असून सहायक पोलीस आयुक्त डॉ. हिरे करीत आहेत. (Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed