Pimpri Police MPDA Action | पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोघा सराईत गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी केले स्थानबद्ध; नव्या वर्षातील पहिली एमपीडीए कारवाई
पिंपरी/ पुणे : Pimpri Police MPDA Action | खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणे, दरोड्याची तयारी करणे असे गंभीर गुन्हे असलेले व कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहचविणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
रजीत लक्ष्मण येरकर Rajit Laxman Yerkar (वय १९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आणि रामदास मारुती साळुंके Ramdas Maruti Salunke (वय ३७, रा. आंबेठाण, ता. खेड) अशी स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
रजीत येरकर याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणे, घातक हत्यार जवळ बाळगुन गुन्हे असे ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पोलीस आयुक्तांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठविला होता. रजीत येरकर याला येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
रामदास मारुती साळुंके याने साथीदारासह खुन, जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, दुखापत करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे असे ८ गंभीर गुन्हे केले आहेत. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवला होता. रामदास साळुंके याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मागील २०२५ वर्षात ३५ गुन्हेगारांवर एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या कारवाया केल्या होत्या.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्र्वेता खेडकर, मारुती जगताप, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, जितेंद्र कदम, रुपाली बोबडे, सहायक पोलीस फौजदार सचिन चव्हाण, ऋषिकुमार झनकर, पोलीस हवालदार व्यंकप्पा कारभारी, अमोल निघोट यांनी केली आहे.
