PM Awas Yojana | पीएम आवास योजनेच्या पैशांचा अनोखा वापर, इकडे मिळाला हप्ता, तिकडे 11 पुरूषांचे घर विस्कटले

Marriage Scam

नवी दिल्ली : PM Awas Yojana | सामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीएम आवास योजनेची सुरुवात करण्यात आली होती. परंतु, तिचा आता चुकीचे पद्धतीने वापर केला जात आहे. असे वृत्त आहे की, उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये अनेक महिलांनी या योजनेला आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचे साधन बनवले. कारण, ११ महिलांवर पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा आरोप आहे. घर देणारी ही पीएम आवास योजना ११ पुरूषांचे घर विस्कटण्यासाठी निमित्त ठरली आहे.

हे वृत्त येथील संपूर्ण परिसरात आगीसारखे पसरले आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, पत्नी गमावल्यानंतर आता पीडित पुरूषांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. समस्या ही निर्माण झाली आहे की, अधिकारी या लोकांना आवास योजनेंतर्गत पुढील हप्ता देण्यास नकार देत आहेत.

हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील ठूठीहारी, शीतलापुर, चटीया, रामनदर, बकुलडीहा, खेसहरा किशुनपुर आणि मेधोली गावात सुमारे २३५० लाभार्थी महिलांना पीएम आवास योजनेचा हप्ता देण्यात आला. यापैकी अनेकांची घरे पूर्ण तयार झाली आहेत. यापैकी ११ महिला अशा निघाल्या ज्यांनी पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता म्हणजे ४०,००० रुपये मिळताच आपल्या पतीला ताबडतोब सोडले.

पीएम आवास योजनेंतर्गत ही तरतुदही आहे की जर या पैशांचा वापर इतर ठिकाणी करण्यात आला
तर त्यांच्याकडून पुन्हा पैशाची वसूली सुद्धा केली जाईल.
यापूर्वी बाराबंकी जिल्ह्यात सुद्धा अशाप्रकारच्या घटना समोर आल्या होत्या.
या योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून अडीच लाख रूपये मिळतात.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed