PM Modi In Wardha | तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून चालवत आहेत काँग्रेस पक्ष; वर्ध्याच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

PM-Narendra-Modi

पुणेरा आवाज – PM Modi In Wardha | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्ध्यात काँग्रेसवर टिकास्त्र सोडत म्हटले की, काँगेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचं समर्थन केलं आहे. तो बेइमान आणि भ्रष्टाचार्यांचा पक्ष आहे. तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. (PM Narendra Modi On Congress)

https://www.instagram.com/p/DAIhbk9pQBC

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी वर्ध्यात अनेक विकास कामांचे उद्घटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रध्देचा आणि संस्कृतीचा अपमान केला आहे. जर त्यांनी श्रध्देचा, आस्थेचा सन्मान केला असता तर, गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेला विरोध केला नसता. कर्नाटकमध्ये तर काँग्रेसने कहर केला. त्यांचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की, त्यांनी गणपती बाप्पाला तुरूंगात टाकलं. ज्या गणेश मूर्तीची लोक पूजा करत होते तीच मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली.

https://www.instagram.com/p/DAIjMyepXCj

काँग्रेसचे तुष्टीकरणाचं भूत जागं झालं

मोदी म्हणाले की, गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे. ज्या उत्सवाने समाजातील प्रत्येकाला एकत्र आणलं त्या उत्सवाचा काँग्रेसने तिरस्कार केला. अलीकडेच मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते पाहून काँग्रेसचा जळफळाट झाला आहे. त्यांच तुष्टीकरणाचं भूत जागं झालं आणि त्यांनी गणेश पूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला. एका समजाचं, वर्गाचं तुष्टीकरणं करण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते.

https://www.instagram.com/p/DAIVYxOtGGa

सर्वात भ्रष्ट पक्ष

मोदी म्हणाले की, काँग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/DAIQXmmp1uS

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed