PM Modi Maharashtra Sabha | पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, महायुतीच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार

मुंबई: PM Modi Maharashtra Sabha | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला त्यानंतर आता विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत.
राज्यात ८ नोव्हेंबरला महायुतीची (Mahayuti) पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला दोन सभा दिल्या आहेत.
त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील,
असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
भाजपने केंद्रीय मंत्र्यांनाही महाराष्ट्राच्या प्रचार यंत्रणेत उतरवले आहे. त्यामुळे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या केंद्रातील नेत्यांच्याही सभा होणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा