PM Modi Pune Sabha | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला शरद पवारांचा धसका ! संपुर्ण भाषणात पवारांचा उल्लेख टाळला

PM Narendra Modi

पुणे : PM Modi Pune Sabha | महाराष्ट्रात तेही पश्‍चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताकदीचा अनुभव आज आला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवारांचा नामोल्लेख टाळत सत्तेसाठी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केल्याचे परिणाम निकालात उमटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत शरद पवार अथवा त्यांचा नामोल्लेखही करणे टाळल्याने शरद पवार यांची ताकद अधोरेखित झाली आहे.

महाराष्ट्रातील ताकदवर नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) विरोधात लाट असताना देखिल भाजपकडून (BJP) महाराष्ट्रात शरद पवार यांना टार्गेट करण्यात आले होते. परंतू यानंतर सत्तेच्या गणितांमध्ये मित्र पक्ष शिवसेनेला (Shivsena) डिवचून राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्याच्या सत्तेत सोबत घेण्यासाठी पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख थेट राजकिय गुरू म्हणून करत चुचकारण्याचा प्रयत्न केला.

यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकिय घडामोडींमध्ये शिवसेना सोबत येत नसल्याने भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळाला लावण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेत पहाटेचा शपथविधीही उरकला. परंतू शरद पवारांनी काही तासांत बाजी पलटवत ७२ तासांचे देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार पाडून शिवसेना, कॉंग्रेससोबत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट बांधत सत्ता स्थापन केली. तेंव्हापासून महाराष्ट्रात शरद पवार हेच भाजपचे एकचे शत्रू राहीले आहेत.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावत पहिली शिवसेना फोडली आणि वर्षभरात राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली. शिवसेना आणि पक्ष चिन्हासह मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे राहील याची काळजी घेणार्‍या भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राहील हेच पाहीले. परंतू या फोडाफोडीचे परिणाम भाजपला यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भोगावे लागले.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सर्वाधिक शाब्दीक हल्ले झाले. यातून पवार आणि ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीच वाढली. राष्ट्रवादी सोबत पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामती या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना उमेदवारी देउन भाजपने एक मास्टरस्ट्रोक मारला. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हडपसर येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोदींनी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहाणारी ‘भटकती आत्मा’ असा शरद पवारांचा नामोल्लेख न करता उल्लेख केला होता. याचा जबरदस्त उलट परिणाम संपुर्ण राज्यात झाला. राज्यात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले तर भाजप महायुतीची चांगलीच पिछेहाट झाली. याचा परिणाम भाजपची केंद्रातील एकहाती सत्ता जाण्यावरही झाला.

लोकसभेची पार्श्‍वभूमी पाहाता विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजित पवार
यांनी बारामतीत विधानसभेसाठी भाजपचे नेते मोदी, अमित शहा यांच्या सभा नको, असे स्पष्ट करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
तर आज दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील २१ मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्यानंतर शरद पवार
यांचा नामोल्लेखही टाळत लोकसभेतील चूक दुरूस्त केल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यातील २१ पैकी तब्बल १३ जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विरोधात उभे आहेत.
पवारांवरील टीकेचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो,
याचा अंदाज आल्यानेच मोदी यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे टाळत महाविकास आघाडीतील
केवळ कॉंग्रेसला टार्गेट केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात उमटू लागली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed