PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यामुळे मंगळवारी जड वाहनांना शहरात प्रवेश बंद ! स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील वाहतूकीत बदल

Narendra Modi

पुणे : PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मंगळवारी पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यामध्ये त्यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा (SP College Ground) होणार आहे. त्यामुळे या काळात शहरात प्रवेश करण्यास जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात येत आहे़, असे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

१) ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक प्रवेश बंद

पर्यायी मार्ग : ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळण घेऊन निलायम पुलाखालून सिंहगड रोड वरुन इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग : नाथ पै चौक ते सरळ सिंहगड रोड जंक्शनवरुन इच्छित स्थळी जातील़

२) बाबुराव घुले पथ पथावरुन टिळक कॉलेजचे पुढे आंबील ओढा जंक्शनकडे प्रवेश बंद

पर्यायी मार्ग : टिळक कॉलेज चौकामधून उजवीकडे वळून जॉगर्स पार्क रोड वरुन शास्त्री रोडवरुन इच्छित स्थळी जावे.

३) साने गुरुजी पथ : टिळक रोड जंक्शन ते निलायम पुलापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.

पुणे शहरातील खालील मार्गावर १२ नोव्हेबर रोजी मध्यरात्री पासून ते २४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास प्रवेश बंद राहतील. (PM Modi Pune Visit)

१) सोलापूर रोड : भैरोबा नाला चौकाचे पुढे
२) नगर रोड : खराडी बायपास चौकाचे पुढे
३) आळंदी रोड : बोपखेल फाटा चौकाचे पुढे
४) जुना मुंबई महामार्ग : हॅरीस पुलाच्या पुढे
५) औंध रोड : राजीव गांधी पुलाचे पुढे
६) बाणेर रोड : राधा हॉटेल चौकाचे पुढे
७) पाषाणरोड : शिवाजी पुतळा चौकाचे पुढे
८) पौड रोड : पौड फाटा चौकाचे पुढे
९) कर्वे रोड : वारजे पुलाचे चौकाचे पुढे
१०) सिंहगड रोड : वडगाव पुल चौकाचे पुढे
११) सातारा रोड : मार्केट यार्ड जक्शंन पुढे
१२) सासवड रोड (बोपदेव घाट मार्गे) : खडी मशीन चौक पुढे कोंढवा कडे
१३) सासवड रोड : मंतरवाडी फाटा पुढे हडपसरकडे
१४) लोहगाव रोड : पेट्रोल साठा चौकाचे पुढे ५०९ चौकाकडे

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

Hadapsar Assembly Election 2024 | महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचेय; जयंत पाटील यांचे प्रतिपादन (Video)

Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

You may have missed