PM Modi Visits Dhananjay Chandrachud House | पंतप्रधान मोदीं सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी; विरोधकांचा सवाल; म्हणाले – ‘यामागे सरकार वाचवण्यासाठी…’

मुंबई : PM Modi Visits Dhananjay Chandrachud House | सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सरन्यायाधीशाच्या पदावर चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असताना देखील तीन वर्षे एक बेकायदेशीर सरकार बसवले जातेय. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातंय असं स्वत: सरन्यायाधीश वारंवार म्हणताता, पण निर्णय होत नाही. आता ते निवृत्तीला आले असताना त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचतात यावरून काय बोध घ्यावा?, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, ” खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली तर जात नाही ना? या लोकांच्या मनातील शंका नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनं पक्क्या झाल्या आहेत.
सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला तसंच प्रोटोकॉलला धरून आहेत का? आतापर्यंत मोदी गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले याची माहिती माझ्याकडं नाही. परंतु, ज्या पद्धतीनं काल पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले. त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आरती केली. हे पाहता धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान असं चित्र पाहायला मिळालं “, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा