PMC Administration On Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीवरून अतिरिक्त आयुक्त ऍक्शन मोडवर ! दोषींवर होणार कारवाई; 3 जणांची नेमली समिती
पुणे : PMC Administration On Pune Flood | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने धरणातून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. शहरातही जोराचा पाऊस सुरु आहे. दरम्यान लोकांच्या घरात पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शहरातील काही सोसायट्यांमध्ये छाती एवढे पाणी पाहायला मिळाले.
रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्नही निर्माण झाला. भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने त्याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. आता पावसाने जराशी विश्रांती दिलेली आहे. मात्र पावसात पुणेकरांचे जे हाल झाले याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला.
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्याने सिंहगड रस्तावरील एकतानगर यासह पुलाची वाडी भागात पाणी शिरले, तसेच नदीकाठी राडारोडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याची दखल घेत पुराची कारणमीमांसा करण्यासाठी पुणे महापालिकेने तीन जणांची समिती नेमली आहे.
यात पालिकेच्या बांधकाम, ड्रेनेज व पथ विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे खात्याच्या एका अधिकारी निमंत्रित सदस्य असणार आहे. या समितीने सात दिवसांमध्ये अहवाल सादर करायचा आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर एकतानगर भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या नाल्याचे पाणीही वस्तीमध्ये घुसले. त्यामुळे एकता नगर व परिसरातील अन्य कॉलनी मधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सोमवार पासून राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. राजाराम पूल ते शिवणे यादरम्यान मुठा नदीपात्रात खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून पात्र बुजविले होते.
त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा हेतू होता.
यामध्ये प्रामुख्याने राजाराम पूल ते वारजे पूल यादरम्यान जास्त राडारोडा टाकण्यात आला आहे,
त्यातून अनेक एकर जमीन निर्माण केली आहे.
त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयिस्कर डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नदीकाठी राडारोडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरल्याचे कारण दिले जात आहे.
त्यामुळे या पुराची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.
त्यासाठी पुणे महापालिकेने तीन जणांची समिती नेमली आहे.
सात दिवसांमध्ये अहवाल सादर केल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे
असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी (Prithviraj B P) यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार