PMC Employees Union Protest | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनपा भवन समोर आंदोलन

PMC Employees Union Protest

पुणे : PMC Employees Union Protest | पुणे महानगरपालिकेकडील (Pune Municipal Corporation-PMC) सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल (दि.१८) रोजी पुणे मनपा मुख्य इमारतीसमोर (Manapa Bhavan) भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी हजारो मनपा सेवकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला धारेवर धरले. राज्य शासनाची ग्रामपंचायतीकडील नवनिर्मित पदांना कोणतीही मान्यता नसताना तसेच ग्रामपंचायती मधील आकृतिबंधामध्ये वरिष्ठ लिपिक या पदाची कोणतीही तरतूद नसताना महानगरपालिकेच्या मूळ सेवाजेष्ठता यादीमध्ये व आस्थापनेवर ग्रामपंचायतच्या 34 वरिष्ठ लिपीकांचे समावेशन करण्यात आलेले आहे.

त्यामध्ये त्यांची कोणतीही अहर्ता तपासली गेली नाही , विभागीय परीक्षा पास नाहीत , त्यांचा लिपिक या पदावर 3 वर्ष काम केल्याचा अनुभव नाही तरीही मनपात वरिष्ठ लिपीक पदी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मूळ सेवकांमध्ये तीव्र असंतोष असून प्राधान्याने मूळ सेवकांना प्रथम पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, उप कामगार अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता, सहाय्यक महापालिका आयुक्त या संवर्गातील पदांना देखील पदोन्नती दिली जात नाही, ही बाब यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली . पद्स्कीप चा प्रस्ताव शासन दरबारी तत्कालीन आयुक्त यांनी पाठवलेले असताना त्यावर आता समिती नेमून दिरंगाई का केली जाते. त्यासाठी लागणारा मुख्य सभेचा ठराव पारीत करून तो शासनास पाठवावा तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर पदोन्नतीचा स्तर कमी करून लेखनिक संवर्गाची पदसंरचना व वेतनश्रेणी निश्चित करण्याची मागणी करण्यात यावेळी करण्यात आली.

तसेच सन २००५ नंतर पुणे मनपा सेवेत रुजू झालेल्या सेवकांना सेवा निवृत्तीनंतर वैद्यकीय अंशदायी सहाय्य योजना सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली. सेवकांचे कोणत्याही प्रकारचे खुलासे न मागवता केलेले निलंबन प्राधान्याने रद्द करण्यात यावे. वर्ग 4 मधील अनुकंपा वरील सेवकांना वर्ग 3 मध्ये तात्काळ घेण्यात यावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.

या मागण्याचे निवेदन पृथ्वीराज बी पी ,अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना देण्यात आले.
सदर मागण्यावर आठ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी दिले.
सदर निदर्शनामध्ये पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष श्री. बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी बापू पवार,
सह सेक्रेटरी राजू ढाकणे, गिरीष बहिरट, गणेश मांजरे , सोमनाथ गोरे , विशाल ठोंबरे,
कार्याध्यक्ष श्रीमती पूजा देशमुख यांची सेवकांच्या मागणी बाबत भाषणे झाली.
या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मनपा सेवक उपस्थित होते.
पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सर्व सेवकांचे आभार मानून आंदोलनाची सांगता झाली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक