PMC News | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या 2 जागा 6 महिन्यांपासूनच रिक्तच ! नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती न केल्याने शासनाची भुमिका संशयाच्या भोवर्‍यात

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

पुणे : PMC News | लोकसभा निवडणुकीपुर्वी (Lok Sabha Election 2024) एप्रिलमध्ये महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. परंतू सहा महिने होत आले तरी त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. महापालिकेच्या जवळपास सर्वच विभागांचा कार्यभार एकाच अतिरिक्त आयुक्तांना पार पाडावा लागत आहे. एकिकडे सत्ताधारी पुण्यासाठी कोट्यवधी रुपये निधीच्या प्रकल्पांची घोषणा करत असताना त्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारीच नेमत नसल्याने राज्य शासनाच्या ‘हेतू’ बद्दलच शंका उपस्थित करण्यात येउ लागली आहे.

https://www.instagram.com/p/DALgGqXiVf8

यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान लोकसभेच्या सात टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या घोषणेपुर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणार्‍या प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्‍यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली. शासनाने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकार्‍यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकार्‍यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकार्‍यांच्या जागेवर अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त पदावर डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांची तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागांपैकी केवळ एका जागेवर पृथ्वीराज बी.पी. या (Prithviraj B P IAS) आयएएस अधिकार्‍याची नेमणूक झाली.

https://www.instagram.com/p/DALcLibilJV

परंतू उर्वरीत दोन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांच्या जागा रिक्तच ठेवण्यात आल्या. जूनमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपली. यानंतर उपायुक्तांच्या रिक्त जागांवर शासनातील अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. साधारण त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागाही भरण्यात येतील अशी अपेक्षा होती. परंतू आता सप्टेंबर महिना संपत आला असतानाही या दोन्ही जागा रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील जवळपास सहा महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडेच सर्वच विभागांचा कारभार आला आहे.

https://www.instagram.com/p/DALTMqcCTH_

नुकतेच झालेल्या पावसाळ्यात नदीला दोन तीन वेळा आलेला पूर, खड्डेमय रस्ते, मिसिंग लिंकसाठी भूसंपादनाच्या प्रक्रिया, मिळकत कराची वसुली, शहर स्वच्छता अभियान, कर्मचार्‍यांच्या नियमीत बदल्या, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण, पाणी पुरवठा अशा सर्वच महत्वाच्या विभागांतील दैनंदीन कामांपासून प्रकल्पांच्या सुरू असलेल्या कामांवरील देखरेख आणि निर्णय प्रक्रिया यावर एकटयाच अधिकार्‍याला लक्ष द्यावे लागत असल्याने प्रशासनाचा गाडा रुळावरून घसरला आहे. अशातच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्र्यांचे दौरे, बैठकांना उपस्थिती यासाठीही एकाच अधिकार्‍यावर लोड असल्याचे पाहायला मिळत असून कामाच्या अति ओझ्यामुळे नागरिकांना वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटणेही मुश्किल झाले आहे. अशी परिस्थिती असताना शासन अद्याप अतिरिक्त आयुक्तपदाच्या रिक्त जागा का भरत नाही? यावरून प्रशासकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/DALNlq9CNId

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

You may have missed