PMC News | कर्वेनगर, शिवणे येथे नदीपात्रात भराव टाकणार्‍यांवर होणार कारवाई ! भराव काढण्याचे काम महापालिकेच्यावतीने तातडीने सुरू

Rajendra-Bhosale

नदीकाठ सुधार योजनेमुळे पूरस्थितीच्या आरोपात तथ्य नाही – डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त

पुणे : PMC News | मुठा नदी पात्रामध्ये (Mutha River) कर्वेनगर (Karve Nagar) तसेच शिवणे (Shivane( येथे चार ते पाच एकर नदीकाठावर भराव टाकल्याप्रकरणी सहा जागा मालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने याठिकाणी जेसीबी, डंपरसह आवश्यक यंत्रणा लावून दोनशेहून अधिक डंपर भराव हटविण्यात आला आहे. संबधितांवर कारवाई असून भराव काढण्याचा खर्चही वसुल करण्यात येईल. नदीकाठ सुधार योजनेमुळे पूरस्थिती निर्माण झाली या आरोपामध्ये तथ्य नाही. पाटबंधारे विभाग आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेउनच काम करण्यात येत आहे. यातूनही काही त्रुटी राहील्या असतील तर त्या दुरूस्त करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी सांगितले. (PMC News)

डॉ. भोसले यांनी सांगितले, नदीला आलेल्या पूरामुळे बाधितांचे नुकसान झाले. त्याचे शंभर टक्के पंचनामे झाले आहेत. प्रामुख्याने विठ्ठलनगर, निंबजनगर, एकतानगरी, पाटील इस्टेट, शांतीनगर, येरवडा, पुलाचीवाडी यासह चौदा ठिकाणी नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून रोगराई टाळण्यासाठी औषध फवारणी देखिल करण्यात आली आहे. पूरस्थिती नंतरची परिस्थिती नियंत्रणात आहे. धरणे ऐंशी टक्के भरली आहेत. पावसाचे प्रमाण पाहून खडकवासला धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर ठेवून दिवसा पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाला करण्यात आली आहे.

ब्लू लाईनमधील बांधकामांचा प्रश्‍न न्यायालयाच्या आदेशानुसार सोडविला जाईल

विठ्ठलवाडी परिसरातील काही सोसायट्या नदीपात्रातील ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या एरियात आहेत. यापैकी बहुतांश सोसायट्यांना पुर्वीच्या येथील ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करणे उचित राहील. शांतीनगर झोपडपट्टीच्या लगत असलेल्या नाल्यातून नदीपात्रात पाणी येते. मुळा नदीला पूर येतो त्यावेळी नाल्यातून येणारे पाणी बॅक मारते आणि शांतीनगर वसाहतीमध्ये शिरते. यावर उपाययोजना करण्यात येतील. शांतीनगर येथे लगतच एसआरए योजनेेचे कामही सुरू आहे. या वसाहतीतील नागरिकांचे याठिकाणी स्थलांतर करता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’