PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

Pune PMC

पुणे : PMC News | स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात येतात. दिवसेंदिवस ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याचा विचार करता या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडून पावले उचलली जात आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी महापालिका (Pune Municipal Corporation-PMC) प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

नवी पेठेतील एका अभ्यासिकेला काही महिन्यांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिले होते. त्यानुसार, बांधकाम विभाग तसेच अग्निशामक विभागाच्या वतीने अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

शहरातील १९१ अभ्यासिकांमधील सद्यस्थितीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. अहवालात अभ्यासिकांची रचना, तेथील असुरक्षितता व सुविधांच्या अभावावर प्रकाश टाकण्यात आला होता. महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनीही अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.

महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) म्हणाले, “अभ्यासिकांमधील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात,
कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने निवासाची गैरसोय होते.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब कुटुंबातील ५०० ते १००० विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे.” (PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

You may have missed