PMC News | पुणे: शहरातील कचरा प्रकल्पांतून आरडीएफ, खत आणि रिजेक्ट वाहून नेणार्‍या वाहनांनाही जीपीएस सिस्टिम अनिवार्य करणार

Pune PMC

पुणे : PMC News | महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पातून निघालेले आरडीएफ, खत आणि रिजेक्ट कोठे टाकण्यात येते याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी हे वाहून नेणार्‍या प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टिम बसविण्यात येईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली.

महापालिकेच्या रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून दौंड तालुक्यातील देउळगाव वाडा या गावातील एका स्टील कंपनीच्या बॉयलरसाठी प्लास्टिकचा कचरा आणि चिंध्या घेउन निघालेला ट्रक ग्रामस्थांनी पकडून यवत पोलिसांच्या स्वाधीन केला. राज्य प्रदूषण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिकच्या कचर्‍याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेउन चालकावर गुन्हा दाखल केला. २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेच्यावतीने रामटेकडी पसिरातील सर्वच कचरा प्रक्रिया प्रकल्पांना ट्रक बाबत विचारणा करणारी नोटीस बजावली आहे. परंतू अद्यापही हा ट्रक कोणत्या प्रकल्पातून गेला आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही अशी माहिती संदीप कदम यांनी दिली.

दरम्यान, महापालिकेने नुकतेच देवाची उरूळी कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रक्रियेच्या निविदेत महुआच्या गाईडलाईननुसार शहरातून गोळा झालेला आणि प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत जाणार्‍या कचर्‍याचे ट्रॅकींग करण्यासाठी कचरा वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टिम अनिवार्य केले आहे. परंतू प्रथमच बायोमायनिंगच्या निविदेत प्रक्रिया झाल्यानंतर तयार होणारे आरडीएफ, खत आणि रिजेक्टची अंतिम विल्हेवाट एमपीसीबीच्या गाईड लाईन नुसार होते की नाही? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही वाहतूक करणार्‍या वाहनांना देखिल जीपीएस सिस्टिम अनिवार्य केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर यवत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणानंतर प्रशासनाने यापुर्वी सुरू असलेल्या सर्वच प्रकल्पांतून आरडीएफ,
खत आणि रिजेक्ट वाहून नेणार्‍या वाहनांचे देखिल ट्रॅकिंग करण्यासाठी जीपीएस सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाप्रत प्रशासन आले आहे.
यासंदर्भात बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडून मान्यता घेण्यात येईल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed