PMC News | मालवणच्या घटनेनंतर पुणे महापालिका सतर्क; शहरातील 50 हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय

Pune PMC

पुणे : PMC News | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed ) दुर्दैवी घटना घडली. यावरून राज्यात संतापाची लाट आहे. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. (PMC Structural Audit Of 50 Statues In Pune)

त्यावेळी मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही या घटनेवर माफी मागितली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनीही याबाबत माफी मागितली. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.”

दरम्यान आता मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महापालिकेचे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील ५० हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इमारत रचना विभागाने अशा पुतळ्यांची माहिती संकलित केली असून सोमवार, आजपासून (दि.१) कामाला सुरुवात होणार आहे.

कर्वे रोड, येरवडा, कसबा पेठ, मध्यवर्ती पेठ परिसर, कोथरूड, मंडई आणि शिवाजीनगर परिसरात राज्य सरकारचा निधी, देणग्या आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एकदा पुतळे बसविण्यात आल्यानंतर त्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही.

तसेच पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष केलं जात. फक्त जयंती आणि पुण्यतिथीला पुतळ्याची स्वच्छता होते.
त्यानंतर वर्षभर पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे शहरातील अनेक पुतळे धुळखात पडून आहेत.

उभारण्यात आलेले हे पुतळ्यांसही विविध समुदाय, समाज व संघटनांच्या भावना जोडल्या आहेत.
त्यामुळे पुतळा ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. पुतळ्याची विटंबना होऊ नये, याची काळजी घेतली जाते.

” नगरसचिव कार्यालयाकडून ५० पुतळ्यांची माहिती मिळाली आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट सुरक्षा आणि पुतळ्याच्या अवस्थेचा विचार करून ऑडिट केले जाणार आहे.
या पुढे पुतळ्यांची पुरेशी सुरक्षा राखली जाईल आणि जिथे आवश्यक असेल त्या पुतळ्यांची दुरुस्ती करण्यात येईल”,
अशी माहिती इमारत रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख (Chief Engineer Yuvraj Deshmukh) यांनी दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed