PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत ! मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

Dirty Main Roads In Pune

File Photo

पुणे – PMC News | महापालिकेचा हडपसर, वानवडी झोन वगळता संपुर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘मॅकेनिकल’ स्विपिंगचे काम मागील सहा महिन्यांपासून ठप्प आहे. यामुळे या रस्त्यांच्या कडेला मोठ्याप्रमाणावर अस्वच्छता दिसत असून धुळीचे लोटही उधळत आहेत. घन कचरा विभागाकडून निविदा राबविण्यास झालेला विलंब, निविदा राबविताना ‘सल्लागाराने’ दिलेला चुकीचा सल्ला यामुळे ३५ टक्के अधिक दराने आलेल्या निविदा यामुळे स्वच्छतेचा ‘बट्टयाबोळ’ झाला आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी तीन ते चार महिने विशेष प्रयत्न करणार्‍या प्रशासनाचा खरा चेहेरा यानिमित्ताने समोर आला आहे.

मागील काही वर्षांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता मॅकेनिकल पद्धतीने होते. यासाठी महापालिकेच्या पाचही झोनमध्ये स्वतंत्र निविदा काढून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येते. यापैकी चार झोनमधील कामाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली. ही मुदत संपण्याअगोदरच प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविणे अपेक्षित होते. मात्र, निविदा प्रक्रियेस विलंब झाला व अशातच लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे हडपसर – वानवडी झोन वगळता अन्य चार झोनमधील रस्त्यांच्या स्वच्छतेचे काम जवळपास ठप्पच झाले आहे.

लोकसभेच्या आचारसंहितेनंतर प्रशासनाने सल्लागाराच्या मदतीने निविदा प्रक्रिया राबविली. ही प्रक्रिया राबवत असताना जुन्याच दराने ती राबविण्यात आली. परंतू यामध्ये जेटींग मशीनने रस्ते दुभाजक आणि पदपथांची नियमित स्वच्छतेचा अंतर्भाव करण्यात आला. सुरवातीला यासाठी एकच निविदा आल्याने मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर अन्य काही कंपन्यांनी सहभाग नोंदविला. परंतू या निविदा उघडल्यानंतर त्या साधारण ३५ ते ४० टक्के अधिक दराने आल्या आहेत. वस्तुस्थिती अशी की या कामाचा अनुभव असलेल्या आणि पुर्वी काम केलेल्या कंपन्यांनी कामाचे दर वाचून परवडत नसल्याने निविदा प्रक्रियेत सहभागच घेतला नाही.

यासंदर्भात घन कचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदा ३५ टक्क्यांहून अधिक दराने आल्याने फेरनिवदा काढण्यात यावी, असे निवेदन महापालिका आयुक्तांकडे ठेवण्यात आले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर पुढील निर्णय होईल. तूर्तास क्षेत्रिय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची स्वच्छता करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच हडपसर- वानवडी झोनमधील ठेेकेदारांच्या वाहनांचीही मदत घेण्यात येत आहे.

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे जी २० च्या स्ट्रीट फर्निचरची ऐशीतैशी

महापालिकेने मागीलवर्षी जी २० च्या निमित्ताने प्रमुख रस्त्यांवर स्ट्रीट फर्निचर करून घेतले आहे.
यासोबतच सीएसआरच्या माध्यमांतून वाहतूक बेटांचीही सजावट केली आहे.
परंतू जी २० संपल्यानंतर केवळ महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे या सजावटीची ऐशीतैशी झाली आहे.
क्षेत्रिय कार्यालयांकडे अंतर्गत स्वच्छतेसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे.
त्यांच्याकडे प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळ व पुरेशी यंत्रणा नाही.
त्यामुळे अनेक रस्ते आणि पुलांवर देखिल कचरा आणि मातीचे ढीग आढळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. (PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed