PMC Recruitment 2024 | पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 650 जागांची होणार भरती; अर्ज कुठं करायचा? जाणून घ्या
पुणे : PMC Recruitment 2024 | पुणे महापालिकेत नोकरीची (Jobs In PMC) सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत ६५० जागांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा महिने विविध विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. (Pune Municipal Corporation-PMC)
याबाबत अर्ज भरण्याची सविस्तर माहिती पुणे महापालिकेच्या www.pmc.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज समाज विकास विभागाकडे तसेच संबंधित विभागाकडे सादर करावा लागणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जवळ येत असल्याने, इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेतून निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आणि पर्यावरण विभाग यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शिष्यवृत्ती स्वरूपात वेतन दिले जाणार आहे.
बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका धारकांना ८ हजार रुपये,
तर पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा वेतन मिळेल.
“या योजनेद्वारे राज्य सरकारने तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आता सहा दिवसांचा अवधी उरलेला असल्याने अधिकाधिक युवकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत,
असे आवाहन उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक