PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

PMC

पुणे : PMC Solid Waste Management Dept | एकीकडे पाणी पुरवठा विभाग पुरेसा अनुभव नसल्याचे कारण देत पात्र निविदा अपात्र करत आहे . तर दुसरीकडे घनकचरा विभाग कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा अनुभव असल्याची अट काढण्यासाठी ‘बाह्य’ यंत्रणांचा वापर करून वरिष्ठांवर दबाव आणत असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. घनकचरा विभागाने शहर स्वच्छतेपेक्षा महापालिकेची तिजोरी साफ करण्याचा एककल्ली कार्यक्रम  हाती घेतल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

घनकचरा विभागाने नुकतेच देवाची उरुळी येथील साठवलेल्या उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली आहे. विशेष असे की यापूर्वीच्या कामाची निविदा फेब्रुवारी मध्येच संपली आहे. NGT च्या आदेशानुसार यापुर्वी सुमारे 21 लाख टन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया करून काही एकरवरील कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले आहेत. याचे एनजीटी ने स्वागत केले असून उर्वरित कचरा देखील लवकरात लवकर नष्ट करण्याबाबत आदेश दिले आहेत. आजही या ठिकाणी 10 लाख टनहुन अधिक कचरा आहे.

फेब्रुवारी मध्ये काम संपण्यापूर्वी घनकचरा विभागाने केवळ अडीच लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या निविदेवर कारवाई सुरू केली. एनजीटी चे आदेश असल्याने तत्कालीन आयुक्तांनी प्रत्यक्ष देवाची उरुळी येथील कचरा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे दहा लाख टनहून अधिक कचरा असल्याचे निदर्शनास आले. तसेच घनकचरा विभागाच्या आशीर्वादाने यामध्ये शहरातील हजारो टन कचरा देखील आणून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तडकाफडकी एका कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई देखील केली. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश दिले. (PMC Solid Waste Management Dept)

नुकतेच रामटेकडी (Ramtekdi) आणि हांडेवाडी (Handewadi) येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही निविदांमध्ये आरडीएफची अट घालण्यात आली आहे. दोन्ही प्रकल्प 75 टन क्षमतेचे असले तरी रामटेकडी साठी ‘ठाणेकर’ नेत्याच्या मर्जीतील ठेकेदाराला आणि ‘पोलिटिकल’ पार्टनरला मिळाव्यात याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. प्रस्तावाला मंजुरी आणि दुसऱ्याच दिवशी वर्क ऑर्डरचे कामही केले गेले.

या निविदेवरून झालेल्या मनस्तापामुळे महापालिकेत नव्यानेच दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. यामुळेच देवाची उरुळी येथील बायोमायनिंग प्रकल्पाच्या कामासाठी अटीशर्ती कडक ठेवल्या आहेत. या कामाच्या पुर्वीच्या यापूर्वी काढलेली निविदा व राज्य व अन्य राज्यातील महापालिकांमध्ये याच कामासाठी असलेल्या अटी शर्ती अर्थात कचऱ्यापासून इंधन (RDF) निमिर्ती करणे, बीड कॅपिसिटी नसणे या प्रमुख अटी कायम ठेवताना केंद्रीय पातळीवर  महूआ चे नियम व अटी उर्वरित कामासाठी लागू केल्या आहेत. यासाठी प्रति टन 844 रुपये दराचे एस्टीमेट केले आहे. साधारण 10 लाख टन कचरा गृहीत धरला तरी 84 कोटी रुपयांची निविदा होत आहे. परंतु आरडीएफ च्या अटीमुळे  अनुभव नसलेल्या मर्जीतील ठेकेदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. हे काम कचऱ्या ऐवजी सिव्हिल अर्थात रस्ते अथवा बांधकामाच्या क्षेत्रातील मर्जीतील ठेकेदारांना (Contractor) मिळावे यासाठी आता घनकचरा विभाग बाह्य यंत्रणांचा वापर करत असल्याचे समोर येत आहे. यावरून महापालिकेतील अन्य विभागातच नव्हे तर घनकचरा विभागातील जुन्या अधिकाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

नुकतेच वारजे जलकेंद्रात फेज एक व दोन तीन वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी चालविण्यास देणे व देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. या कामासाठी पश्चिम बंगाल मध्ये असे काम केलेल्या एका मराठी व्यावसायिकाची निविदा पात्र ठरली.
परंतु यानंतर हीच निविदा त्या व्यावसायिकाला  कामाचा पुरेसा अनुभव नसल्याचा अनुभव नसल्याचे कारण देण्यात आले.
वस्तुत: संबंधित व्यावसायिकाने बंगालमध्ये एकाच आवारात असलेल्या दोन जलकेंद्रांच्या व्यवस्थापनाचे
काम केल्याचे पुरावे जोडल्यानंतर देखील त्याला अपात्र ठरवल्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे.
मात्र पाणी पुरवठा विभागाने फेरनिविदा (Tender) काढण्याचा निर्णय घेत
रद्द निविदेची छाननी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करत त्याचा बळी दिला आहे.

महापालिकेच्याच दोन विभागातील कार्यपद्धती पाहता घनकचरा विभागाकडून बाह्य यंत्रणांना हाताशी धरून
बायोमायनिंग प्रकल्पातील आरडीएफ अर्थात कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याची अट शिथिल करण्याचा दबावा
पुढे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त झुकणार? याची उत्सुकता वाढली आहे
अशी माहिती घनकचरा विभागातील एका अभियंत्याने दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed