PMC Solid Waste Management Dept | ‘राजकीय’ ठेकेदारांसाठी प्रकल्पांच्या ‘कोट्यवधीं’च्या निविदा प्रक्रिया; घरोघरी जाऊन कचरा वेचणारे ‘कष्टकरी’ मात्र ऐन पावसाळ्यात रेनकोटविना, घनकचरा विभागाचा प्रताप

PMC Solid Waste Management Dept

पुणे – PMC Solid Waste Management Dept | कचरा प्रक्रिया प्रकल्पांची ‘कोट्यवधीं’ची टेंडर्स काढण्यात मश्गुल असलेल्या घनकचरा विभागाचे दारोदारी फिरून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. या कर्मचाऱ्यांना चप्पल, हॅन्डग्लवज, रेनकोट, ढकलगाड्यांसह अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या घनकचरा विभागाने या वस्तू पुरवल्याच नाहीत. त्यामुळे कचरा वेचकांना भरपावसात भिजतच काम करावे लागत असल्याचे ‘अमानवीय’ दृश्य शहरातील गलोगल्लीत पाहायला मिळत आहे.

महापालिका (Pune Municipal Corporation-PMC) शहरातील सुमारे 70 टक्क्यांहून अधिक घरातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करते. आजमितीला ‘स्वच्छ’ या सहकारी संस्थेसह अन्य संस्थांचे 7 हजारहून अधिक कर्मचारी वर्षभर हे काम करतात. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ संस्थेचा वाटा मोठा असून यामध्ये जवळपास चार हजार कर्मचारी आहेत. गरीब आणि आश्रित घटकातून येणारे हे सदस्य ‘कष्टाची भाकर’ या भावनेतून हे काम स्वीकारतात. अगदी वृद्धत्वाकडे झुकलेले महिला – पुरुष या कामामुळे स्वाभिमानाने जगत आहेत. या कर्मचाऱ्यांना घरटी कचरा गोळा करण्याचे दरमहा 80 रुपये मिळतात. त्यांना दरवर्षी हॅन्डग्लोवज, रेनकोट, साबण, अँप्रन आणि ढकलगाड्या पुरवण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे.

परंतु यावर्षी महापालिकेकडून त्यांना या वस्तूंचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यासाठी स्वच्छ संस्थेकडून अगदी जानेवारीपासून घनकचरा विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही त्यांना या वस्तू मिळालेल्या नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांकडे रेनकोट नाहीत. त्यामुळे त्यांना भरपावसातच हे काम करावे लागत आहे.
जुन्या ढकलगाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे.
नव्याने गाड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्या गाड्यांच्या आकारत ‘ बचत’ करण्यात आल्याने त्या लुडकत आहेत.
येथेही भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कचरा गोळा करायच्या बकेट नाहीत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed