PMC Truck Falls Into Sinkhole | पुण्यात रस्ता खचून टँकर खड्ड्यात कसा गेला? कारण आलं समोर; जाणून घ्या

v

पुणेः PMC Truck Falls Into Sinkhole | शहराच्या मध्यभागी असलेल्या सिटी पोस्टच्या आवारात (City Post Office Pune) पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation – PMC) टँकर रस्ता खचून अचानक खड्ड्यात पडला. सुदैवाने या धक्कादायक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. (Pune Belbaug Chowk)

https://www.instagram.com/p/DAK72NApqWE

या घटनेबाबत बोलताना महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) म्हणाले, ट्रक खड्ड्यात गेल्याच्या ठिकाणी विहीर होती. त्या विहिरीवर स्लॅब टाकून पेव्हर ब्लॉकचा रस्ता करण्यात आला होता. पुणे महापालिकेचा ड्रेनिज साफ करण्याचा टँकर त्या रस्त्यावर आला. या टँकरच्या मशीनचे वजन खुप असते. रस्ता टँकरचे वजन अधिक काळ पेलवू शकला नाही. त्यामुळे दुपारी अचानक टँकर खड्ड्यात गेल्याचे त्यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAJPd6jpVn9

परंतु हा टँकर खड्ड्यात कसा गेला? याचं नेमकं कारण आता समोर आले आहे. सिटी पोस्टची इमारत १९२५ साली उभी करण्यात आली होती. त्यावेळी त्या इमारतीसमोर आणि आसपासच्या भागात विहीर आणि हौद होते. आता ज्याठिकाणी गणपतीच्या १० दिवसात दगडूशेठ गणपती बाप्पा बसतो. त्याठिकाणी सुद्धा हौद होते. तर सिटी पोस्टच्या समोरच्या गल्लीतही हौद बांधण्यात आले होते. सिटी पोस्टच्या समोर श्रीकृष्ण टॉकीज आहे. त्याच्या खाली विहीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAI-3NvpHQi

सिटी पोस्टची इमारत हे इंग्रजांनी केलेले बांधकाम आहे. त्याकाळात विहीर आणि हौद यांचा विचार करूनच त्यांनी या वास्तू उभ्या केल्या आहेत. त्यानंतर मात्र सिटी पोस्टमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीने याठिकाणी महापालिकेने रस्ता बांधला होता. त्यावेळी अवजड वाहनांची रहदारी याठिकाणी नव्हती. परंतु काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार याठिकाणी पोस्टाचे ट्रक येण्यास सुरुवात झाली.

https://www.instagram.com/p/DAI8582pMbv

पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करताना त्याठिकाणी विहिरीवर स्लॅब टाकला. व पेव्हर ब्लॉकचा रस्ता याठिकाणी करण्यात आला. पेव्हर ब्लॉक टाकताना अवजड वाहनांचा विचार केला गेला नाही. तरीही या रस्त्यावरून पोस्टाचे ट्रक ये-जा करत होते. त्यामुळे ते पेव्हर ब्लॉक कमकुवत झाल्याची चर्चा स्थानिकांकडून ऐकायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/DAI0dkHp_by

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)