PMPML CNG Bus Fire | कात्रज चौकात पीएमपीच्या सीएनजी बसला आग; आगीचे कारण अस्पष्ट
पुणे : PMPML CNG Bus Fire | कात्रज चौकात (Katraj Chowk Pune) रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. कात्रज अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दिवसभर शहरात प्रवास करून कात्रज डेपोच्या बस कात्रज चौकात पार्क केल्या जातात. त्यातील एका बसला ११ वाजताच्या सुमारास चालक उभी करून निघून गेला. त्यानंतर काही वेळातच बोनेटमधून धूर येत असल्याचे रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तत्काळ कात्रज अग्निशमन दलाला दिली. (PMPML CNG Bus Fire)
अग्निशमन दलाकडून तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात आली.
यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
आगीचे कारण समजू शकले नसल्याचे कात्रज अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
वेळेत आग आटोक्यात आणल्याबाबत अग्निशमन दलाचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा