PMPML Employees Strike | विविध मागण्यांसाठी पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे हाल
पुणे : PMPML Employees Strike | विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पीएमपी कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि.२९) संप सुरु केला आहे. या संपाला शिवसेनेकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. संपामुळे पीएमपी संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील किमान १२ लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा काही मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या.
या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदारांना बसला.
दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात
येत असून याबाबत चर्चेला सुरुवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु