PMRDA Action On Unauthorized Pubs, Bars, Restaurants in Pirangut | ‘पीएमआरडीए’ची अनधिकृत पब-बारवर धडक कारवाई, मुळशीतील अनधिकृत 10 पब, बार जमीनदोस्त (Video)
पुणे : मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंटवर ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) मागील दोन दिवसांमध्ये कारवाईची धडक मोहीम राबवली आहे. मुळशी तालुक्यातील पिरंगटु (Pirangut) परिसरातील सायबा बार, अर्थव रेस्टो बार, सोनाली रेस्टो बार, जिप्सी रेस्टो बार आदी चार अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटवर पीएमआरडीए कडून कारवाई करुन बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत 21 हजार 124 चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि.18) करण्यात आली. (PMRDA Takes Action Against Unauthorized Pubs, Bars, and Restaurants in Pirangut)
त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवार दि. 19) पीएमआरडीए ने आपला मोर्चा भूगाव व भुकूम भागात वळविला. येथील ड्रंक इन लेक, सँडल वूड, बनियार्ड ब्रिस्ट्रो, राजहंस रेस्टो बार, टी टू बार, टॅप्स अँड टॉक्स अशा एकूण सहा अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 28 हजार 555 चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. पोकलेने, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, सहाय्यक आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार मनीषा तेलभाते व बजरंग चौगुले, अभियंता सुनील पोवार, अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोणीही अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक