PNB Consumer Loans | होम, ऑटो आणि पर्सनल लोन सर्व झाले महाग, ‘या’ सरकारी बँकेने दिला मोठा झटका, व्याजदर वाढवले
नवी दिल्ली : PNB Consumer Loans | सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेची सर्व कालावधीची कंझ्युमर लोन महाग झाली आहेत. या सरकारी बँकेने एमसीएलआरमध्ये 0.05 टक्के अथवा 5 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. पीएनबीने शेयर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, एक वर्षाच्या कालावधीसाठी स्टँडर्ड एमसीएलआर आता 8.90 टक्के असेल, जो आधी 8.85 टक्के होता.
याचा वापर मोटर वाहन तसेच पर्सनल सारख्या बहुतांश कंझ्युमर लोनच्या मुल्यांकनात केला जातो. 3 वर्षाचा एमसीएलआर पाच बेसीस पॉईंट वाढून 9.20 टक्के झाला आहे.
याशिवाय एक महिना, तिमाही आणि सहामाही कालावधीसाठी व्याजदर 8.35-8.55 टक्केच्या कक्षात असतील. एक दिवसाच्या कालावधीसाठी एमसीएलआर 8.25 टक्केच्या स्थानी 8.30 टक्के असेल. नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
एमसीएलआर म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) भारतीय रिझर्व्ह बँकेचा सर्व बँकांसाठी एक इंटरनल बेंचमार्क रेट आहे, तो 1 एप्रिल 2016 पासून लागू केला आहे. एमसीएलआरद्वारे बँक हे ठरवते की ते लोनवर किती व्याज लावू शकतात.
बँक ऑफ इंडियाने सुद्धा एक वर्ष कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 0.05 टक्के वाढ करून तो 8.95 टक्के करण्याची घोषणा बुधवारी केली होती. मात्र, उर्वरित कालावधींसाठी दर जैसे थै आहेत. मे 2022 पासून आरबीआयने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने व्याजदर वाढवले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर