Police Inspector Deepak Vaman Bagul Arrested | पैसे परत मिळवून देण्यासाठी 1 लाखांची मागणी, लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

ACB-Police

मुंबई : Police Inspector Deepak Vaman Bagul Arrested | टिळक नगर पोलीस ठाण्याचे (Tilak Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक वामन बागूल Deepak Vaman Bagul (वय-56) यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराला फसवणूकीतील रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली एक लाखांची मागणी केली. तडजोडी अंती 35 हजारांची रोकड स्वीकारताना सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. (Sr PI Deepak Bagul ACB Trap)

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या परिचयातील एका महिलेला क्रेडिट सोसायटीद्वारे पैसे दुप्पट करुन देणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून 27 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यापैकी काही रक्कम तक्रारदार यांना परत देऊन उर्वरित 17 लाख 50 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशाची विचारणा केली. तेव्हा महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावून बागुल यांच्यासमोर हजर करण्यात आले. बागुल यांनी महिलेकडून पैसे काढून देण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. (Deepak Bagul Bribe Case)

तक्रादार यांनी याबाबत बृहन्मुंबई एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता बागुल यांनी तक्रारदार यांना सोमवारी येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पडताळणी केली असता बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे उर्वरित पैसे महिलेकडून परत मिळवून देण्याकरीता तडजोडी अंती 35 हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा लावण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस उपायुक्त (अति. कार्यभार अपर पोलीस आयुक्त) राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed