Police Protection Of Political Leaders | निवडणूक संपताच राजकीय पुढाऱ्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश, ‘या’ 29 नेत्यांचे पोलीस संरक्षण काढले, जाणून घ्या
पुणे: Police Protection Of Political Leaders | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) काळात राजकीय पदाधिकाऱ्यांना, प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दरम्यान ३० जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते (Milind Mohite DCP) यांनी दिले आहेत.
राजकीय पक्षाच्या उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण देण्यात येते. पुणे पोलिसांनी शहरातील राजकीय पुढाऱ्यांना तसेच काही व्यावसायिक व अन्य क्षेत्रातील व्यक्तींना पोलीस संरक्षण दिले होते. हे संरक्षण सोमवार (दि.२५) पासून काढून घेतले आहे.
यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील टिंगरे, चंद्रकांत मोकाटे, आमदार बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, ज्ञानेश्वर कटके यांसह शिवम आंदेकर, अक्षय ढावरे, दत्ता बहिरट, अश्विनी कदम, सचिन दोडके, प्रशांत जगताप, मनीष आनंद, किशोर शिंदे, मयुरेश वांजळे, आबा बागूल, कमल व्यवहारे, श्रीकांत कुलकर्णी, मिनल शिंदे, मंगेश ससाणे, साईनाथ बाबर, भारती चव्हाण, सुधाकर शिरसाट, किशोर शिरसाट, मृणाल ढोले पाटील, निलेश गिरमे, विद्या आवारे यांचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी