Police Recruitment in December | पोलिस दलात भरती होण्याची संधी! डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत १२०० पदे

Maharashtra-Police

मुंबई: Police Recruitment in December | राज्यात नुकतीच पोलिस भरती राबवण्यात आली. त्यामध्ये तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना आता पुन्हा पोलिस दलात भरती (Maharashtra Police Bharti) होण्याची संधी मिळणार आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडेसात हजार त्यात मुंबईसाठी १२०० पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. (Police Recruitment in December)

कोरोनामुळे राज्यात पोलिस भरती रखडली होती. तसेच अनेक जण निवृत झाल्याने मोठी पदे रिक्त झाली होती. मनुष्यबळ कमी झाल्याने दोन वर्षांत १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. मात्र, या भरतीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सध्या राज्यात २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही भरती पूर्ण झाल्यावर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

या सोबतच राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्राची देखील क्षमता वाढवली जाणार आहे.
सध्या १० प्रशिक्षण केंद्रांमध्ये ८४०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते.
येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईत ४,२३० पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे ५ लाख ६९ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार ५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग हवालदार आणि २४ बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed