Police Sub Inspector Missing In Pune | मी चाललो असे स्टेटस ठेवून पीएसआय गेले निघून ! पुणे पोलिस शोधात, लोणीकंदमध्ये हरविल्याची तक्रार दाखल

पुणे : Police Sub Inspector Missing In Pune | मी चाललो, माझा शोध घेऊ नका, असे स्टेटस ठेवून लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलीस उपनिरीक्षक घरातून निघून गेले आहेत. त्याविषयी हरविल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडू कोळपे PSI Rahul Khandu Kolpe (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (Sr PI Savlaram Salgaonkar) यांनी माहिती दिली. राहूल कोळपे हे २०१५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या डी पीवर मी चाललो, माझा शोध घेऊ नका, असे स्टेटस ठेवले व ते कोठेतरी निघून गेले. त्यांचे स्टेटस पाहून त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केल. तेव्हा त्यांचा कोठेच पत्ता मिळून आला नाही. सायंकाळी त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यास लोणीकंद पोलीस ठाणे (९५२७०६९१००) यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता