Policeman Dies Due To Heart Attack | दुर्दैवी !गणपती विसर्जन मिरवणुकीत जीव तोडून डान्स केल्यानंतर पोलिस हवालदाराचा मृत्यू

Policeman Dies Due To Heart Attack

अहमदनगर : Policeman Dies Due To Heart Attack | पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी तूफान डान्स केल्यानंतर सायंकाळी हार्ट अटॅकमुळे 36 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना सेामवारी सायंकाळी अहमदनगर शहरात घडली. घटनेमुळे व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे (वय ३६) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. ते सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station Nagar) कार्यरत होते. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी त्यांना बंदोबस्तासाठी जायचे होते.

आदल्या दिवशी होते पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन

नगर शहरातील पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारीही गणेशोत्सव साजरा करतात. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी थाटामाटात मिरवणूकही काढली जाते. कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी अशीच मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये पोलिस कर्मचारी मोरे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत पांढरा कुर्ता घालून, भगवा फेटा बांधून सहभागी झाले होते.

हिंदी मराठी चित्रपटातील गाणी स्पीकरवर वाजविली जात होती. त्यावर पोलीस बेधुंद होऊन नाचत होते. त्यातील मोरे यांचा डान्स लक्षवेधक ठरला. त्यांच्या डान्सचे सर्वांनी कौतुक देखील केले. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. तेथे सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मनमिळावू स्वभावामुळे अनेक मित्र

मोरे मनमिळावू स्वभावाचे असल्याने पोलिसच नव्हे तर नागरिकांमध्येही त्यांचे मित्र होते. त्यांनी काही काळ तोफखाना पोलिस ठाण्यात काम केले. त्यानंतर ते कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची नियुक्ती सध्या मार्केटयार्ड पोलिस चौकीत होती. शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी आज मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

स्पिकरचा आवाज मर्यादित

मोरे यांनाही बंदोबस्तावर जायचे होते. त्याआधी पोलिस ठाण्यातील गणरायाला निरोप दिल्यानंतर मोरे यांचे निधन झाले.
त्यामुळे जिल्हा पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मिरवणुकीत मोठे स्पीकर लावलेले वाहन आणले होते.
मात्र, त्याचा आवाज मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed