Policeman Dies Of Heart Attack | पोलिस हेड कॉन्स्टेबलचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, ड्युटीवर असताना अचानक छातीत दुखायला लागलं अन्…

Deepak Gundu Sutar

सिंधुदुर्ग : Policeman Dies Of Heart Attack | पोलिस हेड कॉन्स्टेबलचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. दीपक गुंडू सुतार (वय-५२) असे मृत्यू झालेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. मूळ पाटये पुनर्वसन येथील व सध्या झरेबांबर स्थित दोडामार्ग पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. काल शुक्रवार (दि.१०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहितीनुसार, दीपक सुतार हे सकाळी पोलिस ठाण्यात कामावर आले असता अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यामुळे ते स्वतःच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा आजिलो येथे पाठविले. तोपर्यंत सुतार यांचे नातेवाईकही दोडामार्ग येथे आले होते.

दरम्यान सुतार यांना पुढील उपचारासाठी आजिलो येथे नेत असताना पुन्हा हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. सुतार हे १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

You may have missed