Policemen Suspended In Pune | पुणे: रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या महिलेशी लग्नास नकार ! तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख व सोन्याच्या दागिन्याचा केला अपहार; पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पुणे : Policemen Suspended In Pune | महिलेशी रिलेशनमध्ये राहून तिच्या पतीच्या मृत्युनंतर विमाचे ५ लाख रुपये व २२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन अपहार करुन महिलेला मारहाण करुन लग्नास नकार देणार्या पोलीस शिपायाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police) गुन्हा दाखल झाला. त्यामुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
तुषार अनिल सुतार (Tushar Anil Sutar) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) नेमणूकीला होता. यातील फिर्यादी महिला आपल्या पती व मुलासह रास्ता पेठेत राहतात. २०१९ मध्ये त्यांची तुषार सुतार याच्याबरोबर फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रुंपातर प्रेमात झाले. फिर्यादी महिलेला तुषार याने पत्नीबरोबर राहत नाही असे सांगून फिर्यादी यांना सोबत राहण्याबाबत विनंती केली. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला. (Pune Crime News)
फिर्यादी व तुषार यांच्या रिलेशनमध्ये असल्याबाबत तिच्या पतीला समजल्यावर त्याने महिलेला घराबाहेर काढले. तुषार व ही महिला व त्यांचे मुलीसह सुमारे तीन वर्षे आंबेगाव येथे एकत्र रहात होते. दरम्यान, फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली. १९ सप्टेबर २०२१ रोजी या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्याच्या पॉलिसीचे ९ लाख रुपये या महिलेला मिळाले. या पैशांपैकी तुषार याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ५ लाख रुपये व २२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गेला. ते पैसे व दागिने परत न करता त्याचा अपहार केला.
या महिलेने लग्नाबाबत विचारले असता तुषार सुतार याने तिला मारहाण व शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला.
त्यामुळे तिने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याने पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Sigh Gill) यांनी तुषार सुतार याला निलंबित केले आहे. (Policemen Suspended In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा