Puja Khedkar | ‘लैगिक छळाची तक्रार केली म्हणून…’; अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांचा आरोप

Pooja Khedkar

दिल्ली : Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात आहेत. खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांच्या असाधारण मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. त्याठिकाणच्या पोलिसात त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळ केल्याची तक्रार दिली होती.

बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी यूपीएससीने, पोलिस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकरणात कारवाई सुरू केली. यासोबतच नागरी सेवा परीक्षा- २०२२ च्या नियमांनुसार पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा- २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासाठी / भविष्यातील परीक्षांमधून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली. त्यानंतर पूजा खेडकर नॉट रिचेबल होत्या. त्या नेमक्या कुठे आहेत याबाबत कोणतीही माहिती नव्हती.

दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी सुरु झालेली आहे. यामध्ये यूपीएससीने अधिकारी म्हणून काही संरक्षण दिलेले असते. यानुसार पोलिसांनी माझी चौकशी करू नये तर यूपीएससीने करावी अशी मागणी करत खेडकरने अटकेला विरोध केला आहे. तसेच आपण ४७ टक्के अपंग असल्याचेही एम्सचे प्रमाणपत्र कोर्टाला सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केला आहे.

खेडकर यांच्या वकील वीणा माधवन यांनी कोर्टात खेडकर यांची बाजू मांडली आहे. पूजा खेडकर यांना उच्च न्यायालयाने मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे. यावर कोर्टाने माधवन यांना कोर्टाचे आदेश सादर करण्याची विचारणा केली आहे. युपीएससीने खेडकर यांनी परीक्षा देण्यासाठी तीन जादाचे प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

तुम्ही म्हणताय की हायकोर्टाने तुम्हाला त्याची परवानगी दिली आहे, ती सादर करावी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीके जंगला यांनी म्हटले आहे. यावर युपीएससीच्या वकिलांनी खेडकर या अतिरिक्त परीक्षा देण्यास पात्र आहे असा उच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नव्हता, असे म्हंटले आहे.

वैद्यकीय मंडळाने पूजा खेडकर ही एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेली उमेदवार असल्याचे म्हटलेले आहे. तिला कायमस्वरूपी बेंचमार्क अपंगत्व आहे. तिच्या संपूर्ण शरीरात ४७ टक्के अपंगत्व आहे. याचे प्रमाणपत्र एम्सने दिलेले आहे, मग ही फसवणूक कशी म्हणता येईल असा युक्तीवाद खेडकरच्या वकिलांनी केला.

युपीएससीने दोषी हा शब्द वापरला आहे. आम्हाला फक्त नोटीस आलेली आहे.
फौजदारी खटला दाखल करण्यात युपीएससीला एवढी घाई का झाली?
मला माझी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती.
फौजदारी खटला आणि अटकेच्या भीतीमुळे मी माझी बाजू मांडू शकत नाही,
असा युक्तीवाद खेडकर यांच्या वकिलांनी केला. माझी बाजू मांडण्यासाठी मला अटकपूर्व जामीन हवा आहे,
असेही वकिलांनी कोर्टाला सांगितले.

खेडकर यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे आणि म्हणूनच हे सर्व तिच्याविरुद्ध केले जात आहे,
असा गंभीर आरोपही खेडकर यांच्या वकिलांनी केला. माझा व्यवस्थेवर आणि न्यायालयांवर विश्वास आहे,
असे खेडकर म्हणाल्या. युपीएससीने दोषी ठरविल्यासच पोलिसांकरवी चौकशी करावी
अशी मागणी देखील खेडकर यांनी न्यायालयात केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार

You may have missed