Poonam Vishal Vidhate | पूनम विशाल विधाते यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड

Poonam Vishal Vidhate

पुणे: Poonam Vishal Vidhate | | बाणेर येथील पूनम विशाल विधाते यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसे नियुक्ती पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Ajit Pawar NCP) सुनील तटकरे (Sunil Tatkare), महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. महिला सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सतत देत असलेल्या योगदानाची पक्षाने दखल घेत विधाते यांना मोठी जबाबदारी दिली आहे. (Poonam Vishal Vidhate)

ह् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुणे शहर महिला कार्याध्य्क्ष पदी माझी निवड झाली. खरंतर समाजासाठी काम करत असताना आपण पूर्णपणे झोकून देऊन काम करत असतो. लोकांना भेटत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण सामाजिक कामाला राजकीय किनार असेल तर कामांचा वेग दुपटीने वाढतो हा आजवर मी घेतलेला अनुभव आहे. आज महिलांसाठी महिलांचे प्रश्न मांडताना महिलांना सक्षम करण्यासाठी आपण पहिली सुरवात स्वतःपासूनच करायला हवी असं वाटतं. आज खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे जात एक नवीन आव्हानं, नवीन जबाबदारी घेत समाजपयोगी कामे करणार आहे : सौ.पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पदी नेमणूक केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) , कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रिया गदादे यांचे मनःपूर्वक आभार पूनम विधाते यांनी मानले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed