Pramod Nana Bhangire | हडपसरमध्ये ‘मदतीचा हात एकनाथ’ म्हणत नाना भानगिरे यांची बॅनरबाजी, विधानसभेला रिंगणात उतरणार असल्याची चर्चा (Video)

Pramod Nana Bhangire

पुणे : Pramod Nana Bhangire | महायुती सरकारने (Mahayuti Govt) आणलेल्या सरकारी योजनांची माहिती बॅनरद्वारे देत हडपसरमध्ये नाना भानगिरे यांनी विधानसभा निवडणूक (Hadapsar Assembly Election) लढविण्याचे संकेत दिले आहेत. योजना सरकारी असल्या तरी मदतीचा हात एकनाथ म्हणत भानगिरी यांनी स्वतःचा देखील फोटो लावत मतदारसंघात प्रचार केला आहे. हडपसर मतदारसंघातून विधानसभेला उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी भानगिरे यांनी जोरदार तयारी चालवली आहे. (Shivsena Eknath Shinde)

https://www.instagram.com/p/C9CqDTVpw6T

योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) लढवत असल्याने नाना भानगिरे हडपसर मतदारसंघात जय्यत तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच ते विधानसभेसाठी पेरणी करत होते. हडपसर मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) चेतन तुपे (Chetan Tupe) हे विद्यमान आमदार आहे.

महायुतीत ही जागा राष्ट्रवादी की शिवसेनेला सुटणार हे जागावाटपानंतरच स्पष्ट होईल. तत्पूर्वी नाना भानगिरे यांनी सरकारी योजनांची माहिती देत मतदारसंघात स्वतःचा फोटो लावून एक प्रकारे विधानसभेसाठीच प्रचार सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळाली नव्हती त्यामुळे आता शिवसेनेने हडपसर, वडगावशेरी आणि खडवासला या ३ जागा मागितल्या आहेत.

याबाबत नाना भानगिरे यांनी म्हटले की, शिवसेनेची ज्या मतदारसंघात ताकद आहे.
ती जागा पुणे शहर शिवसेनेने मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाचा सर्वधिक गतीने विकास झाला.

वाहतूक कोंडीची समस्या, कनेक्टिव्हिटी, पक्की घरे, रोजगार हे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या
माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत. भविष्यात हडपसर भगत मेट्रो कनेक्टिव्हिटी तसेच विविध प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल,
आरोपी गजाआड

Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

You may have missed