Praniti Shinde News | खासदार प्रणिती शिंदेंबाबत 4 नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करणार; माजी आमदाराचा इशारा; म्हणाले – ‘लोकसभेला 31 जागा मिळाल्याच्या धुंदीत राहू नका’

Praniti Shinde-Narsayya Adam

सोलापूर: Praniti Shinde News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीत जागावाटपावरून (MVA Seat Sharing Formula) वादंग सुरु झालेला आहे. सोलापूर मध्यची (Solapur City Central Assembly Constituency) जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला Communist Party of India (Marxist) सुटावी अशी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narasayya Adam Solapur) यांनी मागणी केलेली आहे.

काँग्रेसने सोलापूर मध्य मतदारसंघातून उमेदवार मागे घ्यावा, हा मतदारसंघ माकपला सुटावा यासाठी ४ नोव्हेंबरला सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहोत. त्यामुळे आम्ही ४ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहू. मात्र ४ नोव्हेंबरपर्यंत हा मतदारसंघ माकपला न सुटल्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करू. त्यात काँग्रेस पक्षाच्या चिंधड्या चिंधड्या उठतील,असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे.

लोकसभेला सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि प्रणिती शिंदे यांनी आडम यांच्याकडे पाठिंबा मागितला होता. आडम मास्तर यांनी त्यावेळी सोलापूर मध्य माकपला सुटणार असा दावा केला होता. त्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यावर तेव्हाही भाष्य केले नव्हते.

प्रणिती शिंदे यांनी मागेच सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचा कार्यकर्ता निवडणूक लढेल असे म्हंटले होते. त्यानुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान आता आडम मास्तर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला इशारा दिला आहे.

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले,” माकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य अशोक ढवळे
यांचा बुधवारी रात्री मला फोन आला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मिळविण्यासाठी ४ तारखेपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. आम्ही येत्या ४ तारखेला सोनिया गांधी यांना भेटणार आहोत. त्यामुळे मी ४ तारखेपर्यंत वाट बघणार आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा न सुटल्यास ५ तारखेला मी जनतेच्या दरबारात महाविकास आघाडीत
जी चर्चा झाली, लोकसभेला आम्ही जी मदत केली, त्या वेळी काँग्रेसचे पुढारी माझ्या घरी,
कार्यालय आणि आमच्या पक्षाच्या संपर्कात राहून काहीही करा आम्हाला मदत करा,
अशी विनंती कोणी केली होती. यासंदर्भात ५ तारखेला मी खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी गौप्यस्फोट
करणार आहे, असा इशारा आडम यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, ” निवडणुकीची आमची तयारी झालेली आहे. आमचे हजारो कार्यकर्ते फिरत आहेत.
काँग्रेसवाल्यांना एकच इशारा देतो की, महाराष्ट्राचा हरियाणा होऊ देऊ नका.
हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ देऊ नका.

लोकसभेला ३१ जागा मिळाल्या, त्याच्या धुंदीत राहू नका. डावे पक्ष लहान असतील,
त्यांची ताकद कमी असेल. पण ते प्रामाणिक आहेत”, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed