Prasad Gosavi Passes Away | ‘पोलीसनामा’चे वरिष्ठ बातमीदार प्रसाद गोसावी यांचे निधन

Prasad Gosavi

पिंपरी : Prasad Gosavi Passes Away | पोलीसनामाचे बातमीदार प्रसाद गजानन गोसावी (Prasad Gajanan Gosavi) यांचे आज निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे भाऊ, 2 बहिणी, 2 पुतणे असा परिवार आहे. अपघातानंतर तब्बल सव्वा महिन्याच्या संघर्षानंतर आज त्यांची प्राणज्योत मालविली.

प्रसाद गोसावी हे पोलीसनामा ऑनलाईन मध्ये पहिल्या दिवसापासून वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत होते. कामावरुन घरी जात असताना २२ जुलै रोजी रात्री १० वाजता खडकी रेल्वे स्टेशनजवळ त्यांची गाडी स्लीप झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना तातडीने पिंपरीतील वाय सीएम हॉस्पिटलमध्ये (YCM Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. गेले सव्वा महिना त्यांनी संघर्ष केला. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. डॉक्टरांनी रविवारी सकाळी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. प्रसाद यांचे अवयव दान करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Prasad Gosavi Passes Away)

प्रसाद गोसावी यांच्या पार्थिवावर निगडी स्मशानभूमीमध्ये आज (रविवार) रात्री ९ वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद