President Rule In Maharashtra | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली’, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती; म्हणाले – “मविआला 180 च्या आसपास जागा, त्यामुळेच…”
मुंबई : President Rule In Maharashtra | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी आपली रणनीती ठरवत मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) फटका बसला होता. त्यामुळे आता आगामी विधानसभेसाठी महायुतीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील असं महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) म्हटलं आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असा दावा केला आहे. राज्यात अद्याप विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मात्र चव्हाण यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत दावा केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे “, असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ” केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील.
त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे “,
अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
राज्यात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.
त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी चर्चा आहे. त्याबाबत आता चव्हाण यांनीही दावा केलेला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद