President Rule In Maharashtra | …. तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Assembly Election 2024

पुणे : President Rule In Maharashtra | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी जवळपास शांत झाली आहे. राज्यात (दि.२०) एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. (Maharashtra Politics News)

दरम्यान, राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थापन होणे आवश्यक आहे; परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. बहुतेक एक्झिट पोल्सने महायुतीला बहुमत दिले असले, तरी त्यांना किंवा मविआला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येतो.

विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. २६ तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.

कोणत्याही आघाडी वा युतीला निर्णायक बहुमत न मिळाल्यास कायदेतज्ज्ञांच्या मते सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण द्यावे लागेल. हा पक्ष कोणता असेल, त्यावर आगामी राजकारणाची वाटचाल ठरू शकेल.

बहुमताचा १४५ चा आकडा कोणालाही गाठता न आल्यास मात्र कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या नव्या सदस्यांचे अधिवेशन राज्यपाल बोलावतात. मात्र यासंबंधीचा निर्णय राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर घेतात. त्यासाठी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने म्हणजेच मुख्यमंत्री कोण हे ठरवणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात.

प्रत्यक्षात दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरू शकला नाही तर विधानसभेचा कालावधी संपला,
हे लक्षात घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती येऊ शकते.
दरम्यान आता उद्या (दि.२३) विधानसभेचा निकाल कसा लागतो, याकडे राजभवन लक्ष ठेवून आहे. (President Rule In Maharashtra)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed