Prithviraj Chavan On Ajit Pawar | “दहा वर्षात लाडकी बहीण आठवली नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांवर निशाणा

Prithviraj Chavan-Ajit Pawar

पुणे : Prithviraj Chavan On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आता गावागावात या योजनेचे बॅनर लावले जात आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जेणेकरून महिलांची आर्थिक स्थिती सुधारता येईल.

राज्य सरकारकडून दरमहा देण्यात येणारी १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे पाठवली जाईल. जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रीत करता येईल.

राज्यात जवळपास १ कोटी ५ लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. तर रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. या योजनेवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना पुढील काळात देखील सूरु ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांसमोरील बटन दाबण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेदरम्यान केले आहे. या विधानाबाबत काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न केला असता ते म्हणाले , अजित पवार यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. दहा वर्षात लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही कर्नाटक राज्यात ही योजना यशस्वीपणे राबविली आहे. दोन हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार आम्ही देत आहोत, तेलंगणामध्ये देखील ही योजना राबविली आहे.
त्यामुळे या योजनेसाठी किती पैसे द्यायचे हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ठरवू, अशी भूमिकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed